“‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मा. कृषीमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते”

0
169
Altaf Shaikh

दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्याकडून पोस्टर फ्रेम भेट; २५ ऑक्टोबरला जागतिक स्तरावर होणार प्रदर्शित

पुणे: सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी मा. कॅबिनेट मंत्री गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाचे पोस्टर मा. कृषीमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते प्रदर्शित केले.

यावेळी, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख आणि सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विशाल धेंडे यांनी मा. दादासाहेब जाधवराव यांना चित्रपटाचे पोस्टर फ्रेम भेट दिली.

२५ ऑक्टोबर २०२४ रोजी हिंदी आणि मराठी भाषेत जागतिक स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन पुरस्कार मिळाले असून, वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली आहे.

या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली असून परदेशातही चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here